बीट हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते कारण ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्यात लोह, फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. बीट अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते. पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की बीट कच्चे खाणे योग्य आहे की उकडलेले? आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)
बीट नक्की कसे खावे कच्चे खाणे योग्य की बीट उकडून खाणे शरीरासाठी योग्य ठरते असा प्रश्न असेल तर तुम्ही हे नक्कीच वाचा
कच्च्या बीटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. बीट उकळल्यावर त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळतात
अनेकांना बीट पचण्यास त्रास होतो, ते खाल्ल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते. अशा परिस्थितीत उकडलेले बीट जास्त फायदेशीर मानले जाते
कच्चे बीट रक्तदाब नियंत्रण आणि विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी चांगले आहे. त्यात नायट्रेट्स असतात, जे शरीरात प्रवेश करताच नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलतात. यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते
जर तुम्हाला कोणतीही अॅलर्जी नसेल आणि तुमचे पचन चांगले असेल तर तुम्ही दिवसातून एकदा कच्चे बीट खाऊ शकता. तथापि, कधीकधी तुम्ही उकडलेले बीटदेखील खावे
बीट खाण्याने हिमोग्लोबीन नक्कीच वाढते आणि चांगले राहते, मात्र याचा प्रमाणात वापर करावा आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे अधिक सेवन करू नये