२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षात सोशल मीडियावर अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले होते. भूक लागल्यानंतर पोट भरण्यासाठी अन्नपदार्थांचे सेवन केले जाते.अशावेळी कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जाते. पण यंदा सोशल मीडियावर करण्यात आलेले अन्नप्रयोग पाहून तुम्हाला सुद्धा उलटी येईल. रील्स आणि लाईक्सच्या मागे धावून अनेकांनी अन्नपदार्थांचा खेळ मांडला होतो. चला तर पाहुयात सोशल मीडियावर व्हायरल झालेले सगळ्यात भयानक पदार्थ. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
२०२५ मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले होते 'हे' भयानक कॉम्बिनेशन असलेले पदार्थ

गरमागरम नूडल्समध्ये आंब्याचा रस आणि आंब्याचे तुकडे मिक्स केले होते. आंब्याचे नूडल्स पाहून अनेकांनी त्यावर टिप्पणीसुद्धा केली होती. "आता मला टॉयलेट क्लिनरने माझे डोळे स्वच्छ करावे लागतील." अशी कमेंट नेटकाऱ्यानी केली आहे.

यंदाच्या वर्षी मांसाहारी पदार्थांमधील व्हायरल झालेला अतिशयन वाईट कॉम्बिनेशन असलेला पदार्थ म्हणजे चॉकटेल चिकन टिक्का. मसालेदार पदार्थ चॉकलेटमध्ये तयार केलेला पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सुशी हा पदार्थ जपानी आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पदार्थांमध्ये चक्क ओरियो चॉकलेटचा वापर करून सुशी बनवण्यात आली आहे.

पाणीपुरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण चॉकलेट पाणीपुरी पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामुळे पदार्थाचा दर्जा आणि चव खराब होते.

हैदराबादमधील एका विक्रेत्याने बेसनाच्या पिठात चॉकलेट बार बुडवून त्यापासून डम्पलिंग तयार केले आणि हिरव्या चटणीसोबत खाल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

लहान मुलांसह मोठ्यांना मॅगी खायला खूप जास्त आवडते. पण चहा मॅगी पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये एका माणसाने उकळत्या चहाच्या कपमध्ये शिजवलेली मॅगी ओतली होती.






