थंडीच्या दिवसांमध्ये आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यात अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे. सकाळी उठल्यानंतर नियमित शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून निघते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नियमित शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात नियमित करा सुपरफूड मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याचे सेवन

शेंगदाण्यांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे प्रभावी ठरतात. यासाठी सकाळी उठल्यानंतर पीनट बटर स्मूदी बनवून प्यावी. यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

मधुमेहाच्या रुग्णांची शेंगदाण्यांसोबत गूळ चावून खावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाण्याचे सेवन करावे.

शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज आणि प्रथिने भरपूर असतात. वारंवार थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास शेंगदाणे आणि गूळ खावे. यामुळे रक्ताची कमतरता भरून निघेल.

शेंगदाण्यांमध्ये विटामिन ई, फोलेट आणि रिबोफ्लेविन इत्यादी अनेक घटक असतात. यामुळे मेंदूचे आरोग्य सुरळीत चालू राहते. दररोज काही शेंगदाणे खाल्ल्यास मन तीक्ष्ण राहते.






