रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे छातीत जळजळ वाढणे, बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. ऍसिडी झाल्यानंतर आंबट ढेकर येणे, चक्कर येणे किंवा मळमळ वाटू लागते. अशावेळी अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण गोळ्या औषधांच्या सेवनामुळे काही वेळापुरताच आराम मिळतो. मात्र पुन्हा एकदा छातीमध्ये जळजळ वाढू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला छातीत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
छातीमध्ये वाढलेली जळजळ नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे अन्ननलिकेत वाढलेले पित्त कमी होते आणि पोटातील आम्ल्पित्त पातळ होण्यास मदत होते.
कॅमोमाइल चहाचे सेवन केल्यामुळे पोटात वाढलेले पित्त शांत होते आणि छातीमध्ये जळजळ होत नाही. कॅमोमाइल चहा तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळच्या वेळी पिऊ शकता.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला तुळशीचा चहा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतो. या चहाचे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सेवन केल्यास पोटात वाढलेली जळजळ आणि आंबट ढेकर येणे कमी होते.
सकाळच्या नाश्त्यात नियमित एक सफरचंद खाल्ल्यास ऍसिडिटीची समस्या उद्भवत नाही. याशिवाय सफरचंद खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले फायबर पित्त कमी करण्यास मदत करते.
आल्यामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे छातीमध्ये वाढलेली जळजळ, मळमळ कमी होते. पोटाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आल्याचा रस प्यावा.