वयाच्या चाळिशीनंतर नंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे योग्य ते लक्ष देणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये सुद्धा आणि बदल होऊ लागतात. या बदलांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहार आणि व्यायामाच्या मदतीने तुम्ही शरीरात बदल करू शकता. आज आम्ही तुम्हाला वयाच्या चाळिशीनंतर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे त्वचेवर डाग, पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – iStock)
निरोगी त्वचेसाठी या फळांचे करा सेवन

किवी या फळात विटामिन सी युक्त गुणधर्म आढळून येतात, ज्यमुळे त्वचेवर आलेले डाग निघून जाऊन त्वचा स्वच्छ होते. त्यामुळे दैनंदिन आहारात किवीचे सेवन करावे.

एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स येतात, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि गलोविंग राहते. एवोकॅडो हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय या पदार्थाचे सेवन केल्यामुळे आरोग्य निरोगी राहते.

एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स येतात, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट आणि गलोविंग राहते. एवोकॅडो हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय या पदार्थाचे सेवन केल्यामुळे आरोग्य निरोगी राहते.

लोहयुक्त डाळिंबचे सेवन केल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीर निर्माण झालेली कमतरता वाढते.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई हे फळं खूप आवडते. नैसर्गिक गोडवा असलेल्या फळात विटामिन सी, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय पपईमध्ये एंजाइम पॅपेन नैसर्गिक एक्सफोलिएंटर त्वचा स्वच्छ करण्यासाठी करतो.






