शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.युरिक अॅसिडमुळे शरीरात क्रिस्टल्स तयार होऊन गाऊट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेले क्रिस्टल योग्य वेळी ओळखून औषध उपचार न केल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे हाडांमध्ये आणि शरीरात साचून राहिलेले युरिक अॅसिडचे क्रिस्टल कमी होऊन शरीर निरोगी राहील. (फोटो सौजन्य – iStock)
High Uric Acid च्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' घरगुती पेयांचे समावेश
ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. ओवा खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. गरम पाण्यात तुम्ही ओवा गरम करून खाऊ शकता.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय शरीरात वाढलेली युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला तुळशीचा चहा आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असतात. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा.
विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचेसह आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. यामुळे शरीरात साचून राहिलेले क्रिस्टल कमी होऊन आरोग्य सुधारते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी जिऱ्याचा पाण्याचे सेवन करावे. जिऱ्याचे पाण्याचे सेवन केल्यामुळे युरिक अॅसिड कमी होते.