प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना समजूतदार आणि जबाबदार बनवायचं असतं. पण त्यासाठी त्यांची योग्य प्रकारे वाढ होणं आवश्यक आहे. काही मूलं मोठी होतात, पण त्यांच्यात मॅच्युरिटी दिसत नाही. त्यामुळे लहान वयातच त्यांना योग्य सवयी लावणे गरजेचे आहे. अचानक लाइट गेल्यावर भीती न वाटता टॉर्च वापरणे किंवा लहान संकटांवर शांत राहून उपाय शोधणे शिकवा. त्यामुळे निर्णयक्षमता वाढते.
लहान मुलांसाठी Best Habits. (फोटो सौजन्य - Social Media)
कोणीतरी नाव विचारल्यावर मुले घाबरू नयेत. त्यांना आत्मविश्वासाने स्वतःचं नाव आणि पालकांचे नाव सांगण्याची सवय लावा, यामुळे कम्युनिकेशन स्किल सुधारते.
मुलांनी बाहेर खेळायला जाण्यापूर्वी किंवा कोणत्याही ठिकाणी जायच्या आधी पालकांची परवानगी घेण्याची सवय लावावी. यामुळे त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होते.
मुलांना नम्रपणे बोलणे, मोठ्यांचा आदर करणे आणि सभ्य व्यवहार करणे शिकवा. यामुळे त्यांना चांगली सामाजिक जाणीव विकसित होईल.
कोणते कपडे घालायचे, शाळेच्या वस्तू कशा ठेवायच्या यासारखे छोटे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा. यामुळे त्यांच्यात स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल.
कोणतीही गोष्ट लपवू नये, चुकीसाठी खोटं बोलू नये आणि प्रत्येक गोष्ट विश्वासाने सांगावी, ही सवय लहानपणीच लागली पाहिजे. यामुळे पुढेही ते प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्ती बनतील.