थंडीच्या वातावरणाचा चेहऱ्यावर वाईट परिणाम होतो ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ लागते. त्वचेला सॉफ्ट बनवण्यासाठी अनेकजण बाजारातील क्रीम्सचा वापर करतात पण यातील केमिकलयुक्त पदार्थ आपल्या चेहऱ्याला खराब करू शकतात, ज्यामुळे घरीच तयार केलेला नॅचरल फेसपॅक चेहऱ्यासाठी उत्तम ठरेल.
थंडीत चेहरा सतत कोरडा पडतोय? मग आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर 'हा' फेसपॅक लावा

फेसपॅक तयार करण्यासाठी प्रथम २ ते ४ बदाम नीट बारीक करा. आता, एका भांड्यात ताजी दुधाची क्रीम आणि किसलेले बदाम घाला आणि ते पूर्णपणे मिसळा.

तयार पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थितपाने लावा आणि १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. पॅक सुकला की तुम्ही त्याला धुवू शकता.

चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या पॅकचा चेहऱ्यावर वापर करू शकता.

हिवाळ्यात अनेकदा त्वचेची चमक कमी होते. बदाम आणि क्रीमचा हा फेस पॅक चमकदार त्वचा मिळविण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या फेसपॅक चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करेल.

फेसपॅक नैसर्गिक असला तरी चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करायला विसरू नये






