सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्रीची कायमच चर्चा असते. त्यासोबतच यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर आयएएस किंवा आयपीएस बनणाऱ्या महिला अधिकारी त्यांच्या हटके लूकमुळे सोशल मीडियावर चर्चचा विषय बनवल्या आहेत. त्यातील जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आयएएस अधिकारी अंबिका रैना यांनी स्वित्झर्लंडमध्ये नोकरीची ऑफर नाकारली त्यांची स्वप्न पूर्ण केली आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या. तिच्या कामासोबतच तिचा हटके आणि स्टायलिश लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. चला तर जाणून घेऊया अंबिका रैना यांचे सोशल माडियावरील साडी आणि सूटमधील वेस्टर्न लूक.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Jammu ची मुलगी स्वित्झर्लंडची नोकरी सोडून झाली IAS
अंबिका रैना सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अनेकदा ती साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. साड्यांमध्ये तिचा क्लासी लूक दाखवते. तिने या फोटोमध्ये लाल रंगाची कलामकारी साडी नेसली आहे.
आयएएस अंबिका साडीत नाही तर गुलाबी सूटमध्ये दिसत आहे. व्ही-नेकलाइन कुर्ता, डायमंडने सजलेली ओढणी आणि मोकळे केस सोडत केलेला सुंदर लुक चाहत्यांच्या मनावर भुरळ घालतो.
हल्ली सर्वच महिलांना कॉटन साडी परिधान करायला खूप जास्त आवडते. कॉटन साडी आणि साडीला मॅचिंग असा ब्लाऊज परिधान करत अंबिका रैना यांनी स्टायलिश लुक केला आहे.
अंबिका रैना साडी आणि ट्रेडीशन कपड्यांसोबतच वेस्टन कपड्यांमध्ये स्टायलिश दिसतात. या फोटोमध्ये त्या समुद्रकिनाऱ्यावर हिरव्या रंगाच्या स्ट्रॅपी स्लीव्हज असलेल्या ड्रेसमध्ये दिसत आहेत.
आयएएस अधिकारी अंबिका रैना यांचे साडीवर लुक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. गुलाबी रंगाच्या साडीमधील स्टायलिश लुक त्यांच्यावर अतिशय उठून दिसत आहे.