बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात उच्च रक्तदाब वाढल्यानंतर लक्ष दिले जात नाही. सतत दुर्लक्ष केल्यामुळे स्ट्रोक किंवा हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभूळ खावे. यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. नियमित एक वाटी जांभूळ खाल्यास किंवा जांभळाचा रस प्यायल्यास आरोग्यासंबंधित अनेक आजारांपासून शरीराची सुटका होईल. चला तर जाणून घेऊया नियमित जांभूळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
High Blood Pressure नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी ठरेल जांभूळ!
शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित जांभळाचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते.
वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही प्रोटीनशेक किंवा इतर पेयांचे सेवन करण्याऐवजी जांभळाच्या रसाचे नियमित सेवन करावे. जांभळाचा रस प्यायल्यामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते.
साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी उपाशी पोटी जांभळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
दातांना लागलेली कीड किंवा हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी जांभळाची पावडर प्रभावी ठरते. जांभळासोबतच जांभळाच्या बिया सुद्धा आरोग्यासाठी प्रभावी ठरतात.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभळ्याच्या पावडरचे नियमित सेवन करावे. याशिवाय तुम्ही जांभळाचे सुद्धा सेवन करू शकता. जांभूळ रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवतो.