पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला भक्तगण मोठ्या भक्तीने प्रसाद अर्पण करत असतात. कोणी नारळाचे तोरण अर्पण करतात तर कोणी सोन्याचे हार. पुण्यातील लोकप्रिय किंगा आईस्क्रीमकडून गणरायाला आईस्क्रीमचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. ऑरेंज फ्लेव्हरचे हे आईस्क्रीम बाप्पाला प्रसाद म्हणून दाखवण्यात आले (फोटो – टीम नवराष्ट्र)
kinga ice creams offers 133 liters of orange ice cream to Dagdusheth Halwai Ganpati Bappa pune news
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे फक्त देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये देणगी आणि प्रसाद अर्पण करतात.
तब्बल १३३ लिटर फ्रेश दूध, नॅचरल ऑरेंज पल्प व त्यामधील संत्र्याच्या सालींचा क्रश वापरून तयार केलेले 133 लिटर संत्र्याच्या आईस्क्रीमचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दाखविण्यात आला.
पुण्यातील सुप्रसिद्ध किंगा आईस्क्रीमच्या वतीने हा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर आईस्क्रीमच्या प्रसादाचे भाविकांमध्ये वाटप करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा १३३ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्या १३३ वर्षपूर्तीनिमित्त १३३ लिटर आईस्क्रीमचा नैवेद्य किगा आईस्क्रीम च्या वतीने दाखविण्यात आला.
यावेळी किंगा आईस्क्रीम चे संचालक किरण सुरेश साळुंखे आणि गणेश राजेंद्र गोसावी यांसह ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाचे ५ वे वर्ष होते.