भारताच्या ऐतिहासिक वारशांपैकी एक असलेल्या आणि दिल्लीतील प्रसिध्द पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या लाल किल्लाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. लाल किल्ल्याबद्द आतापर्यंत तुम्ही खूप माहिती वाचली असेल. हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पण तुम्हाला या किल्लाचं जुनं नाव माहीत आहे का?
दिल्लीतील लाल किल्ल्याचं जुनं नाव तुम्हाला माहीत आहे का? (फोटो सौजन्य - pinterest)
लाल किल्ल्याला भारताचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. लाल किल्ला दिल्लीतील प्रसिध्द पर्यटन स्थळांपैकी एक आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की या वास्तूचे नाव यापूर्वी लाल किल्ला नव्हते.
१६४८ मध्ये मुघल सम्राट शाहजहानने लाल किल्ला बांधला होता. हा किल्ला आजही भारताचा वारसा आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतही लाल किल्ल्याचा समावेश आहे. याला भारतातील सर्वात खास वास्तू म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. या किल्ल्यावर दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, मोती मशीद, रंगमहाल अशा अनेक सुंदर आणि खास इमारती आहेत.
या ऐतिहासिक वास्तूचे नाव नेहमीच लाल किल्ला नव्हते. लाल किल्ल्याचे खरे नाव किला-ए-मुबारक आहे, ज्याचा अर्थ भाग्यवान किल्ला आहे.
मुघलांचे राजघराणे या किल्ल्याला मुबारक किल्ला असेही म्हणत. लाल किल्ला पूर्वी पांढऱ्या रंगाचा होता, जो इंग्रजांनी लाल रंगात रंगवला होता, त्यानंतर त्याचे नाव लाल किल्ला पडले.