La Brea ही अमेरिकन science fiction वेबसिरीज आहे. 2021 मध्ये NBC या चॅनेलवर प्रदर्शित झाली. यात लॉस एंजेलिसमध्ये एक भला मोठा सिंकहोल अचानक उघडतो आणि अनेक लोक त्यात पडतात. हे लोकं हजारो वर्षांपूर्वीच्या प्रागैतिहासिक जगात पोहोचतात. कुटुंब, विज्ञान, गुंतागुंतीची रहस्ये, आणि वाचण्यासाठीचा संघर्ष अशा अनेक पैलूंचा संगम यात केला गेला आहे.
'La Brea' म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानामधील संघर्ष. (फोटो सौजन्य - Social Media)
लॉस एंजेलिसमध्ये एक सिंकहोल तयार होतो. भर रस्त्याच्यामध्ये हा खड्डा तयार झाल्याने रस्त्यावरील माणसे तसेच आजूबाजूला राहणारी लोकं त्यामध्ये पडू लागतात. त्या खड्ड्यात पडून मृत्यू होण्याऐवजी ते एका वेगळ्या जगात पोहचतात.
मुळात, त्यांना हळूहळू या गोष्टीची जाणीव होते की ते कुण्या दुसऱ्या जगात पोहचलेले नसून, त्यांनी Time ट्रॅव्हल केला असतो. त्या खड्ड्यात पडून ते दहा वर्षांपूर्वीच्या आपल्याच जगात पोहचतात.
अशामध्ये ही सिरीज भूतकाळात अडकलेल्या लोकांचा संघर्ष आणि त्यांना त्या भूतकाळातून वर्तमानात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून केला गेलेला प्रयत्न अशा दोन कथानकांना दर्शवते.
या सिरीजमध्ये रहस्य भरभरून दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर विज्ञान, जगण्याचा संघर्ष, सरकारी गुपिते आणि षडयंत्र अशा अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
२०२१ साली प्रदर्शित झालेली ही वेब सिरीज Netflix वर उपलब्ध असून प्रेक्षकांमध्ये या सीरिजबद्दल फार उत्सुकता आहे. त्या सिंकहोलमध्ये पडलेले ते नागरिक, सिंकहोल बंद झाल्यावर भूतकाळातून वर्तमानात कसे येतात? त्यातील मुख्य पात्राचा जो वर्तमानात जगत असला तरी त्याचा भूतकाळाशी असलेला संबंध काय? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी 'La Brea' ही वेब सिरीज नक्की पहा.