सकारात्मक विचारांनी आपल्याला हवं तसं भविष्य घडवण्याची ताकद असते. सकारात्मक विचार, संयम आणि सातत्य याने व्यक्ती आयुष्यात यशाचं शिखर गाठतो, अशी शिकवण बुद्धांनी जगाला दिली आहे. याचबरोबर रोजच्या मानसिक ताण तणावात ही आयुष्य कसं जगावं याबाबत गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितले आहेत. बौद्ध धर्मात सांगितल्याप्रमाणे बुद्धांनी जगाला दिलेले अष्टांग मार्ग दुःखापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे.
सम्यक दृष्टी : सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन . तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कोणत्या दृष्टीने पाहाता यावरुन तुमच्या दुख आणि त्रासाची तीव्रता ठरते.
सम्यक संकल्प : सकारात्मक विचार आणि ध्येय, म्हणजे वाईट विचारांपासून दूर राहणे. आपलं आणि इतरांचं चांगलं व्हावं ही भावना ठेवणं.
. सम्यक वाणी: कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलणं म्हणजे सम्यक वाणी. खोटे बोलणे, द्वेषपूर्ण बोलणे किंवा कठोर बोलणे हे मानव जातीसाठी योग्य नाही.
सम्यक कर्म : सम्यक कर्म म्हणजे सत्कर्म करणं. प्राणी मात्रांवर भूतदया दाखवणं. तसंच हिंसा, चोरी, किंवा व्यभिचारापासून मनाला लांब ठेवणं.
सम्यक आजीविका : कुटुंब आणि संसारासाठी मनुष्याला व्यवसाय करणं महत्त्वाचं आहे. मात्र आपल्या स्वार्थासाठी इतरांना हानी होईल असा व्यवयाय करु नये.
सम्यक व्यायाम : योग्य आहाराप्रमाणे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य व्यायाम ही महत्त्वाचा आहे. मानसिक आरोग्याचा संबंध शरीराशी देखील आहे, त्यामुळे व्यायाम हा महत्वाचा भाग आहे.
सम्यक स्मृती: आयुष्यात त्रास , वेदना होतील अशा आठवणींना विसरुन ज्या आठवणींनी तुम्हाला आनंद होतो. ज्या आठवणी तुम्हाला दु:ख देतात अशा स्मृती आयुष्यात बाहेर काढणे.
सम्यक समाधी- समाधी म्हणजे एकाग्रता किंवा ध्यानधारणा असाही अर्थ होतो.मिळालेल्या चांगल्या आयुष्याबाबत आपण कायमच कृतज्ञ राहयला हवं. मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी आणि मन: शांती मिळण्यासाठी एकाग्रहता वाढवणं महत्त्वाचं आहे.