उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभ मेळ्याला अखेर सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेला हा मेळा 26 फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. महाकुंभात, संगमात पवित्र स्नान करण्यासाठी दूरदूरहून मोठ्या संख्येने संत आणि ऋषी येत आहेत. यावेळी कुंभ मेळ्यात येणारे नागा साधू हे या मेळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत. कुंभमेळ्यात अघोरी आणि नागा साधूंबद्दल नेहमीच चर्चा रंगत असते. त्यांचं राहणीमान सामान्य लोकांहून फार वेगळी असते. तुम्हाला माहिती आहे का? पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील असतात, त्यांच्या आयुष्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
महिला नागा साधूंनाही नग्न व्हावे लागते का? काय आहेत नियम? रहस्यमयी ठिकाणी असतं वास्तव
पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील आपले जीवन पूर्णपणे परमेश्वराला समर्पित करत असतात. बहुतेक लोकांना नागा साधूंच्या रहस्यमयी जगाविषयी माहिती नसते मात्र आज हेच रहस्य आम्ही तुमच्यासमोर उलगडणार आहोत
महिला नागा साधूंचे जीवन फार आव्हानात्मक असते. नागा साधू बनल्यानंतर त्यांना माता म्हटले जाते.माई बडामध्ये महिला नागा साधूंचा समावेश आहे, ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा म्हणतात. नागा हे ऋषी आणि संतांमध्ये एक उपाधी आहे. साधूंमध्ये वैष्णव, शैव आणि उदासी पंथ आहेत. या तिन्ही पंथांचे आखाडे नागा साधू निर्माण करतात
पुरुष नागा साधू हे नग्न राहू शकतात मात्र महिला नागा साधूंना नग्न राहण्याची परवानगी नसते. सर्व महिला नागा साधू वस्त्र परिधान करतात. महिला नागा साधूंनी कपाळावर टिळक लावणे बंधनकारक असते
महिला नागा साधू भगवा रंगाचा कपडा परिधान करतात, जो शिवलेला नसतो. महिला नागा साधूंच्या या पोशाखाला गंटी म्हणतात. महिला नागा साधू बनण्यासाठी 10 ते 15 वर्षे कठोर ब्रह्मचर्य पाळावे लागते
नागा साधू बनण्यासाठी महिलेचा भूतकाळ तपासून ती खरंच यासाठी पात्र आहे की नाही ते तपासले जाते. नागा साधू बनण्यापूर्वी, महिलेला जिवंतपणी पिंडदान करावे लागते आणि तिचे मुंडणही करावे लागते
नागा साधू मुळे, फळे, औषधी वनस्पती, फळे आणि अनेक प्रकारची पाने खातात. कुंभमेळ्यात, पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधू देखील शाही स्नान करतात. महिला नागा साधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्यांची व्यवस्था केली जाते. पुरुष नागा साधूने स्नान केल्यानंतर महिला नागा साधू नदीत स्नान करायला जातात