बिग बोस मराठीच्या पाचव्या पर्वातून गाजलेली सुपरहिट जोडी म्हणजे निकी तांबोळी आणि अरबाज पटेल. सीजनच्या सुरुवातीपासूनच ही जोडी नाव करत होती आता सीजन संपून फार कालावधी झाला तरी या जोडीची क्रेझ काही कमी होत नाही आहे. अरबाज पटेल आणि निकी तांबोळीचा रोमांस पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
पहा! निकी आणि अरबाजची Love Chemistry. (फोटो सौजन्य - Social media)
निकी आणि अरबाज यांनी त्यांच्या @nikki_tamboli आणि @mr.arbazpatel या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोघांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
दोघांनी काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. तसेच राखाडी रंगाचा त्या बॅकग्राउंडला साजेशे असा रंगाचे कपडे परिधान केल्याने छायाचित्र फार आकर्षक दिसत आहेत.
दोघांनी एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून आपले प्रेम व्यक्त करत हे फोटोशूट केले आहे. चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये तर राडाच केला आहे.
पोस्टखाली निकीने छान असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये 'हा यही प्यार है...' असे नमूद केले आहे. कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी जोडीचे भरभरून कौतुक केले आहे.
काही जणांनी दोघांची लव्ह केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न दोघांना केला आहे.