देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. अंगणात रांगोळी, दिव्यांची आरास, कंदील इत्यादी अनेक गोष्टी लावून घराची सजावट केली जाते. यादिवसांमध्ये घर स्वच्छ करून घरात लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. याशिवाय वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार, घरातील सकारात्मक ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी घरात वेगवेगळी झाडे लावली जातात.ही झाडे घरात सुख समृद्धी आणि समाधान कायम टिकवून ठेवतात. त्यामुळे आर्थिक प्रगती होण्यासाठी आणि नशीब खुलण्यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही ही झाडे घरात लावू शकता.(फोटो सौजन्य – istock)
दिवाळीनिमित्त घरात लावा 'ही' लकी प्लांट्स, सुखसमृद्धीमध्ये वाढ होण्यासोबतच घनाचा होईल वर्षाव
मनी प्लांट हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतात आणि कायमच घरात आनंदी वातावरण राहते. त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला मनी प्लांट लावावे, यामुळे धनात वाढ होते.
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. प्रत्येक घरात तुळशीचे झाड लावले जाते. यामुळे घरात सुख शांतता नांदते आणि संपत्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते.
जेड प्लांटला लकी प्लांट किंवा डॉलर प्लांट असे सुद्धा म्हंटले जाते. गोल आणि हिरवीगार पाने धनसंपत्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे ऑफिसमध्ये किंवा घरातील दरवाज्यात हे झाड ठेवावे.
बाबूचे झाड लावणे अतिशय लकी मानले जाते. हे झाड घरात शांती, यश आणि धन आणते. प्रामुख्याने बांबूचे झाड पाण्यात ठेवले जाते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
पीस लिली घरात लावल्यामुळे घरातील हवा शुद्ध होते आणि मानसिक शांतता मिळते. मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी पीस लिलीचे झाड लावावे.