महाभारताचे युद्ध सुरु होते पण जीवनाच्या या रथावर रथारूढ होणाऱ्या योद्ध्यासाठी त्या रथाचे सारथ्य करणारा सारथीही किती महत्वाचा असतो? याचे उदाहरण एका कथेतून पाहुयात. मुळात, महाभारतात अनेक महारथी रथारूढ होते. पण ते एकटे नव्हते त्यांच्यासह रथ हालकणारा सारथीही त्यांच्यासोबत होता. पण सारथी युद्धात किती महत्वाचा? ते पाहुयात.
महाभारतात सारथीचे काय महत्व होते? (फोटो सौजन्य - Social Media)

युद्धात सगळ्यात हुशार सारथी तिन्ही लोकांचा स्वामी स्वतः भगवंत विष्णू होते. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होते. त्याला पाहून कर्णाने शल्यासारखा उत्तम शासक सारथी म्हणून निवडला.

युद्धादरम्यान, अर्जुनाने श्रीकृष्णाला "मी मारलो गेलो तर, तू काय करशील?" असा प्रश्न केला असता श्रीकृष्णाने त्याला सांगितले की "एकवेळ सूर्याने त्याचे स्थान सोडले, समुद्र कोरडा पडला आणि अग्नी कायमस्वरूपी थंड झाला तरीही कर्ण तुला मारू शकणार नाही."

याउलट, जेव्हा कर्ण तोच प्रश्न शल्याला करतो तेव्हा शल्य त्याला म्हणतो की "कर्ण तू मारला गेलास तर मी स्वतः जाऊन त्यांना मारून टाकेल." मुद्दा असा की जे उत्तर श्रीकृष्णाने दिले तेच उत्तर शल्याने देणे अपेक्षित आहे.

पण शल्याच्या मते जसे कर्ण मरणारच आहे आणि तो मेल्यावर शल्य स्वतः पराक्रम गाजवणार आहे. मुळात, सारथी मनोबल वाढवणारा हवा. सकारात्मक उपदेश देणारा हवा. संपूर्ण युद्धात योद्धा हा त्या सारथीशीच बोलतो त्यामुळे त्याच्या कानावर सकारत्मक बोल देणारा हा सारथीच! सखा हा सारथीच!

त्यामुळे युद्ध असो वा जीवन! आपल्या जीवनाचा सारथी म्हणजेच मार्गदर्शक हा नेहमी सकारात्मक आणि मनोबल वाढवणारा हवा.






