महाराष्ट्रात असे एक ठिकाण आहे, पृथ्वीवरील रहस्यमयी ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण एकूण 50,000 वर्ष जुने आहे आणि या ठिकाणाचे रहस्य आजवर वैज्ञानिकही उलगडू शकले नाहीत. हे ठिकाण नक्की कोणते आहे? जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)
महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे सापडते चंद्रावरची माती
बुलढाणा जिल्ह्यात वसलेले लोणार सरोवर हे एक अद्वितीय आणि रहस्यमयी नैसर्गिक ठिकाण आहे. 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले.
या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे हे अग्निजन्य खडकात निर्माण झालेले खऱ्या पाण्याचे जगातील एकमेव सरोवर आहे
लोणार सरोवर परिसरात अनेक दुर्मिळ खडक, खनिज, काचमनी, पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात. इथे कोणतेही कंपास काम करत नाही
लोणार सरोवराचे पाणी जरी खारे असले तरी याच्या बाजूलाच एक खड्डा आहे ज्यात गोड पाणी मिळते.
या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत NASA च्या वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडता आलेले नाही
हे सरोवर उल्कापातापासून तयार झाले आहे. चंद्राच्या मातीच या खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचे नाते असल्याचे Geological Survey of India च्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.