• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Has Criticized The Budget Presented By Devendra Fadnavis

केवळ मोठे आकडे अन् पोकळ घोषणा, प्रत्यक्षात मात्र…; अर्थसंकल्पावरुन काँग्रेसची टीका

अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, असं सपकाळ म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2026 | 05:36 PM
केवळ मोठे आकडे अन् पोकळ घोषणा, प्रत्यक्षात मात्र...; अर्थसंकल्पावरुन काँग्रेसची टीका

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • केवळ मोठे आकडे अन् पोकळ घोषणा
  • सर्वसामान्यांना काहीही मिळणार नाही
  • अर्थसंकल्पावरुन काँग्रेसची टीका
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विकसीत महाराष्ट्र २०४७ ची कल्पना व १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षात भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले आहे. राज्यावरील कर्ज व कर्जाची हमी मिळून १२ लाख कोटींच्या आसपास बोजा आहे. कर्जाच्या हप्त्यापोटी ६५ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे व प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती यात प्रचंड तफावत आहे.

गेल्या अर्थससंकल्पात अनुसुचित जातींच्या योजनांसाठी २२ हजार ६५८ कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात ६ हजार २०० कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. मागासवर्गीय, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या योजनांवर अर्थसंकल्पात मोठ मोठे आकडे जाहीर केले जातात पण प्रत्यक्षात ते खर्च केले जात नाहीत.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यासमोर सर्वात मोठे संकट बेरोजगारीचे असताना अर्थसंल्पात केवळ ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या मेगा भरतीचा भाजपा सरकारचा इतिहास पाहता ही सुद्धा एक फसवी घोषणाच वाटते. लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असे सांगितले असले तरी २१०० रुपये रुपये देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पुन्हा फसवणूक केली आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी फडणवीस सरकारने आधी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील लाखो शेतकरी आजही कर्जमाफीच्या लाभापासून वंचितच आहेत, हे पाहता आजच्या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरु नये. लबाडाचे आवताण जेवल्याशिवाय खरे नाही असे या सरकारचे वागणे आहे.

शेतकरी व कृषी क्षेत्रासाठी काही घोषणा केलेल्या आहेत पण अमेरिकेसोबत केलेल्या व्यापारी करारापुढे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव मिळणे कठीण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी घटण्याचीच भिती जास्त आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अर्थसंकल्पातील घोषणा पुरेशा नाहीत. गेल्या वर्षी चांगला पाऊस पडूनही राज्याचे सिंचन क्षेत्र ५६ लाख हेक्टरवरून कमी होऊन ३९ लाख हेक्टरपर्यंत आले आहे. सिंचनासोबतच पेरणीयोग्य क्षेत्रातही घट झाली आहे. यावरून सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

तिसरी मुंबई, चौथी मुंबई, शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर हे अदानी व अंबानी यांच्या हितासाठी आहे, यातून सामान्य जनतेला काही फायदा होणार नाही. सरकारचे सौरउर्जा धोरणही फसवे आहे, त्यामुळे वीज ग्राहकांवर दिलासा नाही तर प्रति युनिट २६ पैसे अतिरिक्त भार पडणार आहे. स्मार्टमीटरमुळे अगोदरच वीजबिलात प्रचंड वाढ झालेली आहे. दावोसमधून २०२२ ते २०२५ पर्यंत ५० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाल्याचा दावा करण्यात आला पण आर्थिक पाहणी अहवालानुसार तर राज्यात फक्त ६ लाख कोटी रुपयांचीच गुंतवणूक आलेली आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Web Title: Congress has criticized the budget presented by devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • budget 2026
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

अर्थसंकल्पातून पिंपरी- चिंचवडच्या प्रगतीचा मार्ग मोकळा; आमदार गोरखे यांनी सरकारचे मानले आभार
1

अर्थसंकल्पातून पिंपरी- चिंचवडच्या प्रगतीचा मार्ग मोकळा; आमदार गोरखे यांनी सरकारचे मानले आभार

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक
2

Maharashtra Budget 2026 : गुलाबी जॅकेटचा जलवा कायम! अजित पवारांच्या आठवणीत CM देवेंद्र फडणवीसांचा खास लूक

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
3

लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट
4

Maharashtra Budget Live : महामानवांना अर्थसंकल्पातून अभिवादन; चवदार तळे अन् बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांचा होणार कायापालट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Mar 07, 2026 | 12:30 AM
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Mar 06, 2026 | 09:31 PM
MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

Mar 06, 2026 | 09:28 PM
NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mar 06, 2026 | 09:23 PM
आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

Mar 06, 2026 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.