फोटो सौजन्य: Gemini
कार चालवताना लोक नेहमीच पाण्याची बाटली सोबत ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का की ही लहान दिसणारी बॉटल तुमच्या कारला आगीच्या गोळ्यात बदलू शकते? चला जाणून हे होते तरी कसे त्याबद्दल जाणून घेऊयात.
कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars
जेव्हा तुम्ही तुमच्या कारच्या सीटवर पाण्याची बॉटल ठेवता, विशेषतः प्लास्टिकची बाटली, तेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर ती लेन्स म्हणून काम करू शकते. ही बाटली सूर्याची उष्णता आणि प्रकाश एका बिंदूवर केंद्रित करते. जर तो बिंदू कारच्या सीटवर, कागदावर किंवा कपड्यावर पडला तर ती जास्त उष्णता निर्माण करते, ज्यामुळे आग लागू शकते.
अशी घटना घडण्याची शक्यता तेव्हा वाढते, जेव्हा ट्रान्सपरंट पाण्याची बाटली सूर्यप्रकाशाला लेन्ससारखी फोकस करते. पाण्यामुळे प्रकाश एका ठिकाणी केंद्रित होतो आणि त्या ठिकाणी उष्णता खूप वाढू शकते. विशेषतः कारमध्ये बाटली थेट उन्हात ठेवली असेल, तर अशा प्रकारची घटना घडण्याचा धोका अधिक वाढतो.
Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara, कोणत्या SUV मध्ये किती दम?
प्रत्यक्षात पाण्याच्या बाटलीमुळे आग लागण्याच्या घटना खूप कमी प्रमाणात घडतात, पण सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे कारची सीट किंवा डॅशबोर्डसारख्या उघड्या जागी, जिथे थेट सूर्यप्रकाश पडतो, तिथे पाण्याची बाटली ठेवणे टाळावे. बाटली नेहमी अशा ठिकाणी ठेवावी जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, जसे ग्लोव्ह बॉक्समध्ये किंवा सीटखाली. अशा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही आणि तुमची कार मोठ्या धोक्यापासून सुरक्षित राहू शकता.






