ट्राफिकच्या गोंगाटात आणि लोकलच्या गर्दीत हरवलेलं शहर म्हणजे मुंबई. या मुंबईचं शहरीकरण आत्मसात केलं असलं तरी तिच्या कुशीत वसलेली काही शांत ठिकाणं देखील आहेत. हिंदू धर्मात महादेवाला आराध्य दैवत म्हटलं जातं. याच महादेवांच्या मंदिरांची प्रचीन इतिहास जाणून घेऊयात.
MahashivRatri 2025: गजबजलेल्या शहरात दडलेली धार्मिक स्थळं; मुंबईतल्या या प्राचीन शिवमंदिरांना नक्की भेट द्या.
बाबुलनाथ मंदिर : वाळकेश्वर परिसरातील हे 350 वर्ष जुनं मंदिर असल्याचं सांगितलं जातं.
बाभळीच्या झाडाखाली एका गुराख्याला शिवाची पिंड दिसली, आणि म्हणून या मंदिराला बाबुलनाथ असं नाव दिलं, अशी आख्यायिका सांगितली जाते.
खिडकाळेश्वर: देशातील शिवमंदिरांचा अभ्यास केला तर बरीच मंदिरं ही हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील आहेत. याच स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणजे खिडकाळेश्वर मंदिर.
या ठिकाणी महाशिवरात्र आणि श्रावण सोमवारी शिवभक्तांचा मोठा उत्सव सुुरु असतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा निसर्गसौैंदर्याने वेढलेला आहे. मंदिराच्या परिसरात असलेलं तळं येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.खास पक्षी पाहण्यासाठी देखील पक्षी निरीक्षण या ठिकाणाला भेट द्यायला येतात.
जागनाथ महादेव मंदिर: आकर्षक संगमरवरी बांधकाम आणि आजुबाजूला हिरवीगार वनराईच्या कुशीत वेढलेलं घोडबंदर येथील जागनाथ महादेव मंदिर. हे मंदिर मीरा भाईंदर रस्त्यालगत आहे. या ठिकाणी शिवभक्त महाशिवरात्रीला भेट देतात.
श्रीगंगा गोरजेश्वर: शहापूरच्या मानसमंदिराप्रमाणेच डोळ्यांच पारण फेडणारं हे श्रीगंगा गोरजेश्वर महादेवाचं मंदिर. हे 500 वर्ष जुनं प्रचीन मंदिर आहे. या मंदिराचं विशेष आकर्षण म्हणजे येथील शिवपिंड ही पाण्यात असून मंदिर परिसरात गरम पाण्याची कुंड आहेत.