उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडीचे सेवन केले जाते. काकडी खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी काकडीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. घरात पुलाव केल्यानंतर काकडीची कोशिंबीर बनवली जाते. पण कायमच काकडीचे तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही काकडीपासून अनेक नवनवीन पदार्थ बनवू शकता. तुम्ही बनवलेले हे पदार्थ घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. (फोटो सौजन्य – istock)
थंडगार काकडीपासून केवळ रायताच नाहीतर बनवा 'हे' चविष्ट पदार्थ
थंडगार काकडीपासून तुम्ही गरमागरम सूप सुद्धा बनवू शकता. काकडी, दही, पुदिना, लिंबू, काळे मीठ आणि काळी मिरीचा वापर करून बनवलेले चविष्ट सूप शरीराला पोषण देईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी काकडीच्या स्मूदीचे सेवन करावे.थंडगार काकडीची स्मूदी सकाळच्या नाश्त्यात प्यायल्यास लवकर भूक लागणार नाही.
घरात पुलाव, बिर्याणी बनवल्यानंतर काकडी, कांदा, टोमॅटोची कोशिंबीर आवडीने बनवली जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि खाल्ले अन्नपदार्थ पचन होतात.
संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर काहींना काही चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते, अशावेळी तुम्ही काकडीचे सँडविच बनवून खाऊ शकता. काकडीचे सँडविच झटपट तयार होते.
पोटात वाढलेली ऍसिडिटी आणि उष्णता कमी करण्यासाठी काकडीचे सरबत प्यावे. काकडीचे सरबत प्यायल्यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होते.