हिवाळ्याच्या थंडीत अनेक आजारांना खुले आमंत्रण मिळते. याकाळात सर्दी-खोकल्यासारखे आजार होणं एक सामान्य गोष्ट आहे. पण या किरकोळ आजारांसाठी तुम्हाला डाॅक्टरांना गाठण्याची गरज नाही तर तुम्ही घरीच सोपा उपाय ट्राय करुन आजारांना दूर पळवून लावू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत एका काढ्याची सोपी रेसिपी शेअर करत आहोत जो सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवून देण्यास तुमची मदत करेल.
या दोन गोष्टी पाण्यात मिसळून प्या; एका दिवसांत सर्दी-खोकला होईल दूर

सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी तुळस आणि आल्याचा काढा भरपूर फायदेशीर ठरतो. याला बनवणेही फार सोपे आहे.

यासाठी एक कप पाण्यात तुळशीची पाने आणि आले घालून पाणी चांगलं उकळवून घ्या. यानंतर यात मध मिसळा.

तुमचा काढा तयार आहे, काढा हलका कोमट झाला की त्याचे सेवन करा. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे सेवन करु शकता.

तुळस शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर आले कफ विरघळवते आणि घशाला आराम देते. मधामुळे खवखवणाऱ्या घशापासून आराम मिळतो.

हे काढा शरीराला संसर्गापासून वाचवण्यासही मदत करेल आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल.






