श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी शंकरासोबतच नागाची सुद्धा पूजा केली जाते. तसेच घरात वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरा केली जाते. तसेच राज्यानुसार पारंपरिक चवीचे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नागपंचमीच्या नैवेद्यासाठी कोणते पारंपरिक पदार्थ घरी बनवले जातात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. (फोटो सौजन्य – pintrest)
नागपंचमीनिमित्त घरी बनवा 'हे' पारंपरिक नैवेद्याचे प्रकार
महाराष्ट्रामध्ये नागपंचमीच्या दिवशी हळदीच्या पानांतील पातोळ्या बनवल्या जातात. हळदीच्या पानांचा वापर केल्यामुळे पातोळ्यांची चव वाढते आणि रंग पिवळसर दिसतो.
बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी मालपुवा बनवला जातो. गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करून बनवलेला पदार्थ नागाच्या नैवेद्यासाठी बनवतात.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमीच्या दिवशी कढई किंवा तव्याचा वापर करून पदार्थ बनवले जात नाही. म्हणून गव्हाची खीर, उकडीचे कानवले, पुरणाचे दिंड असे अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. गव्हाची खीर चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे.
मध्य प्रदेशमध्ये खीर- पुरी बनवली जाते. याशिवाय अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ अतिशय आवडीने बनवले जातात. तांदळाची खीर चवीला अतिशय सुंदर लागते.
नागपंचमीनिमित्त राजस्थानमध्ये दाल बाटी चुरमा बनवला जातो. तुरीची डाळ आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेली दाल बाटी चवीला अतिशय सुंदर लागते.