हे जग अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. तुम्ही आजवर अनेक थरारक आणि आश्चर्यकारक अशा दंतकथा ऐकल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला वास्तवावर आधारीत एक अशी कहाणी सांगणार आहोत ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. ही कथा आहे इंडोनेशियातील मुरंग कुटुंबाची ज्यांचा चेहरा लहानपणी तर सामान्य होता पण एका विशिष्ट काळानंतर ते सर्वच सरड्यासारखे दिसू लागले. चला यामागील गूढ जाणून घेऊया.
सकाळी माणूस, संध्याकाळी बनला सरडा... संपूर्ण गाव भयभीत; शास्त्रज्ञांनाही उलगडलं नाही कुटुंबाच रहस्य

मुरंग कुटुंब इंडोनेशियातील एका दुर्गम भागात राहते. सूर्या मुरंग नावाच्या एका सदस्याचा लहानपणी चेहरा पूर्णपणे सामान्य होता. पण सूर्या १२ वर्षांचा झाल्यावर विचित्र बदल होऊ लागले.

त्याचे डोळे फुगले, त्वचा घट्ट झाली आणि चेहरा अचानक एका सरड्यासारखा दिसू लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या काही काळातच शरीरात हे बदल घडून आले. म्हणजेच सूर्या मुरंग सकाळी वेगळा दिसत होता सामान्या मनुष्यासारखा पण संध्याकाळ होताच संपूर्ण चित्र पालटले.

फक्त सूर्याच नाही तर त्याच्या मुलांसोबतही अशीच घटना घडली. यामुळे त्याच्या आजूबाजूची लोकही त्यांना घाबरु लागली. अनेक अफवा पसरु लागल्या, काहींनी म्हटलं की, रात्रीच्या वेळी ते सरड्यात रुपांतरीत होतात. स्थानिकांच्या मते, त्यांचा चेहरा रोज सकाळी एक वेगळा आकार घेतो.

डाॅक्टरांनी या प्रकाराची तपासणी करता, याला अनुवांशिक विकाराचा परिणाम असल्याचे म्हटले. त्यांचा असा विश्वास आहे की हा एक दुर्मिळ अनुवांशिक विकार असू शकतो ज्यामध्ये चेहऱ्याची हाडे आणि त्वचा असामान्यपणे बदलते.

अजूनही त्यांना नक्की कोणता आजार झाला आहे याचा सुगावा लागला नाही. त्यामुळेच हा खरोखरंच कोणता अनुवांशिक आजार आहे की, यामागे आणखी काही रहस्य दडलेले हे गूढ अजून गुलदस्त्यातच आहे.






