सर्वच मुली लग्नात मराठमोळा लुक करतात. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने, सुंदर मेकअप करून लग्नासाठी तयार होतात. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच साड्या आणि इतर अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. नऊवारी साडीवर पारंपरिक शेला हातामध्ये घेतला जातो. शेल्याशिवाय मराठमोळा लुक अजिबात चांगला दिसत नाही. हल्ली वेगवेगळ्या पद्धतीने हातांवर शेला घेतला जातो. आज आम्ही तुम्हाला नऊवारी साडीवर शाही आणि रॉयल थाट दिसण्यासाठी कशा पद्धतीने शेला परिधान करावा, याबद्दल सोप्या टिप्स सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
        लग्नातील नऊवारी साडीवर करा मराठमोळा साज! हातावर घ्या या पद्धतीने शेला

पूर्वीच्या काळी राजघराण्यातील महिला या पद्धतीने हातांवर शेला घ्यायच्या. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या लग्नात या पद्धतीने हातांवर शेला घेऊ शकता.

नऊवारी साडीच्या काठाला शोभेल असा शेला विकत घेतला जातो. यामुळे तुमचा लुक आणखीनच सुंदरव दिसेल. बाजारात अनेक वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये शेले उपलब्ध आहेत.

ओढणीच्या फॅब्रिकमधील शेला मॉर्डन आणि स्टायलिश लुक देतो. त्यामुळे हातांवर नेटचा शेला घेतल्यास तुम्ही खूप सुंदर दिसाल.

हल्ली वेलवेटच्या कापडाचा वापर करून अनेक वेगवेगळे शेले तयार केले जात आहेत. त्यामुळे नऊवारी साडीवरील लुक मराठमोळा दिसण्यासाठी तुम्ही या पद्धतीने शेला परिधान करू शकता.

ब्लाऊजच्या प्रिंटला शोभून दिसेल असा शेला परिधान केल्यास तुम्ही लग्नात अतिशय सुंदर दिसाल. डिझायनर साड्यांवर प्रामुख्याने प्रिंटेड शेला उठावदार दिसतो.






