श्रावणात येणाऱ्या मंगळागौरीच्या पूजेसाठी सर्वच महिला कायमच उत्सुक असतात. मंगळागौरीच्या दिवशी छान नटून थाटून नऊवारी साडी नसून फुगड्या आणि इतर पारंपरिक खेळ खेळले जातात. तसेच श्रावणात सण उत्सव मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे सणांच्या दिवशी छान तयार होताना लुक सुंदर दिसण्यासाठी महिला सुंदर सुंदर दागिने घालतात. या दिवसांमध्ये विशेष करून हिरव्या रंगाच्या बांगड्या हातांमध्ये घातल्या जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या बांगड्याचा काही सुंदर डिझाईन्स सांगणार आहोत. या डिझाईन्सच्या बांगड्या नक्की ट्राय करून पहा. यामुळे पूजेच्या दिवशी चारचौघांमध्ये तुम्ही उठून दिसाल. (फोटो सौजन्य – pintrest)
मंगळागौरीनिमित्त साडीवर घाला हिरव्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या!
साडी नेसल्यानंतर सगळ्यांचं हातामध्ये बांगड्या घालायला खूप आवडतात. त्यामुळे हिरव्या रंगाच्या काचेच्या साध्या बांगड्यांमध्ये तुम्ही मोत्याचे कडे किंवा डायमंड बांगड्या घालू शकता.
काहींना हिरव्या रंगाच्या बांगड्यांवर डिझाईन असलेल्या बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या कायमच असतात.
मऊ थ्रेड वर्कचा वापरून हाताने तयार केलेल्या बांगड्या किमतीने महाग असल्या तरीसुद्धा उठावदार दिसतात. या बांगड्या घाल्यामुळे काचेच्या बांगड्यांसारखा खणखण आवाज येत नाही.
वेलवेट किंवा इतर वेगवेगळ्या फॅब्रिकचा वापरून हाताने बनवलेल्या बांगड्या हल्ली सर्वच महिलांच्या हातामध्ये दिसून येतात. या बांगड्यांच्या मध्ये तुम्ही मोत्याचे कडे घालू शकता.
रेनड्रॉप बांगड्या सर्वच महिलांच्या हातामध्ये दिसून आल्या आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न समारंभाच्या वेळी तुम्ही रेनड्रॉप बांगड्या घालू शकता. यामध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत.