फोटो सौजन्य - ColorsTV
सलमान खानचा टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस 19 सध्या सातत्याने चर्चेत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये अनेक स्पर्धकांनी गाजवले आणि त्यांचे दबदबा पाहायला मिळाला. बिग बॉसच्या घरामध्ये अभिषेक बजाज, गौरव खन्ना, कुणीका सदानंद, तानिया मित्तल, जीशान कादरी या स्पर्धकांनी पहिल्या आठवड्यामध्ये धुमाकुळ घातला. काल 30 ऑगस्ट रोजी शनिवारी बिग बॉस १९ चा पहिला विकेंडचा वार पार पडला, यामध्ये सलमान खानने अनेक घरातल्या सदस्यांना खडेबोल चुनावले तर काही स्पर्धकांची खिल्ली उडवली.
सलमान खानने घरातल्या अनेक सदस्यांना रिॲलिटी चेक दिला. तर काहींची स्तुती देखील केली, या आठवड्यामध्ये सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहे. गौरव खन्ना, जीशान कादरी, तानिया मित्तल, नीलम गिरी, नतालिया जानोसेक आणि प्रणीत मोरे या सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. अनेक वृत्तांच्या माहितीनुसार असे म्हटले जात आहे की या पहिल्याच आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्य घराबाहेर झाला नाही.
फरहाना खान हिला घरातला सदस्यांनी घराबाहेर केले होते त्यानंतर गौरव खन्नाच्या निर्णयामुळे तिला पुन्हा एकदा घरामध्ये एन्ट्री देण्यात आले आहे. बिग बॉस १९ च्या पहिल्याच आठवड्यामध्ये नाॅमिनेट झालेल्या सदस्यांचे टेंशन पाहायला मिळाले. गौरव खन्ना आणि अभिषेक बजाज यांनी घरातील सदस्यांशी झालेल्या वादामुळे बातम्यांमध्ये स्थान मिळवले, तर तान्या मित्तलने तिच्या बॉसी अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
नीलम कदाचित वादापासून दूर राहिली असेल, परंतु ती गेममध्ये तिची उपस्थिती दाखवू शकली नाही, ज्यामुळे तिच्या मजबूत दृश्यमानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अभिषेक आणि नेहल चुडासमा यांच्यात रेशनवरून वाद झाला. घरातील सदस्यांनी गौरववर जबाबदाऱ्या टाळण्याचा आरोप केला. बिग बॉस खबरीच्या वृत्तानुसार, या आठवड्यात बिग बॉस १९ मधून कोणताही स्पर्धक बाहेर पडलेला नाही . जरी अनेक स्पर्धकांना नामांकन मिळाले असले तरी, निर्मात्यांनी सर्वांना दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आठवड्यात घरातून कोणीही बाहेर पडणार नाही.
There’s No Eviction For This Week 👁️
Team Khabri 👁️ 🚨#biggboss19 #eviction #GauravKhanna #AshnoorKaur
— Bigg Boss 19 Khabri 👁️ (@BB19Khabri) August 30, 2025
बिग बॉस १९ च्या पहिल्या वीकेंड का वार मध्ये सलमान खानने प्रणित मोरेला जोरदार फटकारले. सलमान म्हणाला, “मला माहित आहे तू माझ्याबद्दल काय बोललास, जे बरोबर नाही. तू माझ्यावर जे विनोद केलेस, जर तू माझ्या जागी असतोस आणि मी तुझ्या जागी असतो, तर तू कशी प्रतिक्रिया दिली असती?”