फोटो सौजन्य- pinterest
आजचा रविवारचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी विशेष राहणार आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. या शुभ योगायोगामुळे लक्ष्मी व्रताची सुरुवात होईल तसेच आज गौरींचे आगमन देखील होणार आहे. चंद्र मंगळ राशी वृश्चिक राशीमध्ये असतील तर सूर्य आणि बुधासोबत केंद्र योग तयार होईल. सूर्य आणि बुध एकत्र आल्याने बुधादित्य योग आणि आदित्य योग देखील तयार होतील. वसुमान आणि चंद्राधी योग देखील तयार होणार आहे. आजचा दिवस वृषभ, मिथुन, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. यावेळी तुम्हाला व्यवसायात भरपूर फायदा होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या किंवा मित्रांच्या मदतीने कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करु शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कपडे आणि भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशा स्रोताकडून लाभ मिळतील. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नफा मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस व्यस्त राहील. काही नवीन संपर्कही होताना दिसत आहेत. तुम्हाला वरिष्ठ व्यक्तीकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात.
रविवारचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. कला आणि साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित फायदा होईल. तुमच्या कोणत्याही रखडलेल्या योजना आज पुन्हा सुरु होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विद्युत उपकरणांशी संबंधित कामात विशेष फायदा होईल.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही साहसी काम करू शकतात. तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी संधी मिळू शकते. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल. व्यवसायात लाभ होऊ शकतो.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायात असलेल्या लोकांना आज लाभ होईल. तुम्ही आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. तुमच्या सर्व चिंता आणि समस्या दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)