अभिनेत्री मिताली मयेकर आणि गायिका जुईली जोगळेकर, लवकरच एक कोलॅब घेऊन येत आहे. यामध्ये ते गोंधळ घालणार आहेत. आई अंबाबाईच्या नावाचा जागर करण्यासाठी दोघीही सज्ज झाल्या आहेत. तसेच त्या जागराचा आस्वाद घेण्यासाठी दोघांनी रसिक मंडळी उत्सुक आहेत. दोघांसाठी अभिनंदनाचा पाऊस होत आहे.
जुईली आणि मिटलाची भक्तिमय कोलॅब (फोटो सौजन्य - Social Media)
गायिका जुईली जोगळेकर @juilee.sangeet या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट केली आहे. ही फक्त पोस्ट नसून चाहत्यांसाठी एक सुंदर अशी बातमी आहे.
ही पोस्ट अभिनेत्री मिताली मयेकर @mitalimayekar या सोशल मीडिया हॅन्डलशी कोलॅब आहे. दोघेही एका देवीच्या गोंधळात झळकणार आहेत.
नवरात्रीच्या निमित्ताने आई अंबेचा उदे करण्यासाठी ते दोघे ही देवीचं गोंधळ प्रस्तुत करत आहेत. जुईलीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये "आवाहन गे माय..तू लवकर गोंधळाला यावं" असे नमूद केले आहे तर पुढे “आई अंबाबाई” हा आमचा गोंधळ लवकरच येतोय तुमच्या भेटीला.." नमूद करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
दोघेही अगदी जागरच्या लुकमध्ये आहेत. हिरव्या रंगाचा साज चढवून अगदी अंबेचा रूप दोघेही भासत आहेत.
कमेंट्समध्ये "आई राजा उधं उधं", "रिलीज डेट कधी आहे?" तसेच "काही तरी धमाकेदार नक्कीच आहे" असे चाहत्यांनी नमूद केले आहे.