उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी चिया सीड्स, दही, ताक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. या थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. याशिवाय शरीर कायम निरोगी राहते. या बियांमध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. याशिवाय दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही दही आणि भिजवलेले चिया सीड्स एकत्र मिक्स करून खाऊ शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला दही आणि चिया सीड्स एकत्र मिक्स करून खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
दह्यामध्ये चिया सीड्स मिक्स करून खाल्यास शरीराला होतील 'हे' गुणकारी फायदे
दही आणि चिया सीड्स एकत्र मिक्स करून खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. याशिवाय आतडे स्वच्छ होतात. दह्यासोबत चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेचा समस्या कायमची दूर होते.
वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. मात्र चिया सीड्स आणि दही एकत्र मिक्स करून खाल्यामुळे वजन कमी होते आणि लवकर भूक लागत नाही.
हाडांच्या मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी चिया सीड्स खावे. कारण यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक खनिजे आढळून येतात.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दही आणि चिया सीड्सचे एकत्र सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी चिया सीड्स खावे.
दही त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. दह्यात असलेले घटक त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करतात. चिया सीड्स आणि दही एकत्र करून खाल्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि चेहरा चमकदार होतो.