नताशा स्टॅन्कोविक सध्या अबू धाबीमध्ये तिच्या सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. वाळवंटात तिच्या आकर्षक पोझच्या फोटोंनी या सुंदरीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविकने नेहमीप्रमाणे तिच्या आकर्षक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नताशाने तिच्या अबू धाबी ट्रिपचे नवीनतम फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आता फोटो व्हायरल होत आहेत.
अबू धाबीच्या वाळवंटात HOT पोझ देताना दिसली नताशा (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

नताशा स्टॅन्कोविक सोशल मीडियावर तिच्या आकर्षक फोटोंमुळे नियमितपणे चर्चेत असते. तिची स्टाईल आणि फॅशन सेन्स नेटिझन्सना खूप आवडते, जिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

आता, नताशा तिच्या सौंदर्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने इन्स्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत आणि तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत. पांढऱ्या ड्रेसमध्ये, ती अबू धाबीच्या वाळवंटात पोझ देताना दिसली आहे.

नताशाने पांढऱ्या ड्रेसमध्ये विविध पोझ देतानाचे फोटो शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तिची सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. चाहते प्रत्येक फोटोवर कंमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.

या फोटोमध्ये, नताशा स्टॅन्कोविकचा वाळवंटातील वाळूवर झोपलेली दिसत आहे. तिच्या संपूर्ण लूकने चाहत्यांना मोहित केले आहे. तिने तिच्या संपूर्ण लुकवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.

पांढऱ्या क्रॉप टॉप आणि पॅलाझो पँटमधील अभिनेत्रीचा स्टाईल चाहत्यांना आवडली आहे. तिने कमीत कमी ॲक्सेसरीज आणि सॉफ्ट मेकअपने तिचा लूक पूर्ण केला. या व्हायरल फोटोंमध्ये नताशा स्टॅन्कोविक खूपच सुंदर दिसत आहे.






