मराठी गायक अभिजीत सावंत सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. अभिजीत नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शेअर करताना दिसत असतो. तसेच गायक सध्या त्याच्या नवीन गाण्याच्या तयारीत व्यस्त आहे. अभिजीतने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याच्या डॅशिंग लूक चाहत्यांना आवडला आहे. तसेच हा लूक नव्या गाण्यासाठी तयार केला आहे का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. गायकाचे या नव्या लूक मधील फोटो आता व्हायरल होत आहेत.
गायक अभिजीत सावंतच्या हटके स्टाईलने वेधले लक्ष! (फोटो सौजन्य - Instagram)
अभिजीत सावंतने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा जबरदस्त लूक चाहत्यांना आवडला आहे. तसेच तो नवा लूक घेऊन कोणते गाणं रिलीज करणार याकडे त्यांचे लक्ष आहे.
अभिजीतने शेअर केलेल्या फोटोमध्ये धोती, काळे टीशर्ट आणि त्यावर मॅचिंग जॅकेट घेतले आहे. तसेच चेहऱ्यावर गॉगल लावून अभिनेत्याने त्याचा लूक पूर्ण केला आहे.
शेअर केलेल्या अर्ध्या फोटोमध्ये अभिजीतच्या मागे लाईट स्पॉट दिसत आहे. तसेच असे वाटत आहे की तो नक्कीच नवीन गाण्याच्या सेटवर आहे. तसेच त्याच्या हातात पैसे देखील दिसत आहे.
अभिजीतच्या या फोटोवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी देखील कंमेंट करून चांगला प्रतिसाद दिला आहे. हा नवा लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.
तसेच आता अभिजीत कोण नवीन गाणं घेऊन येणार याकडे चाहत्याचं लक्ष वेधले आहे. अनेक वर्षानंतर अभिजीत पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्याच्या आवाजाच्या तालावर थिरकवण्यासाठी सज्ज झाला आहे.