नवीन साडी खरेदी केल्यानंतर त्यावर नेमका कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावे, यामध्ये खूप जास्त गोंधळ उडतो. साडीला मॅच होईल असा ब्लाऊज शोधणे सुद्धा कठीण होऊन जाते. पण साडी नेसताना ब्लाऊज शिवून घेण्याची आवश्यकता अजिबात भासणार नाही. हल्ली सर्वच महिला साडीसोबत क्रॉप टॉप स्टाईल करताना दिसत आहे. यामध्ये तुमचा लुक हटके आणि स्टाईल दिसून येतो. जीन्सवर स्टाईल केला जाणारा क्रॉप टॉप आता तुम्ही साडीवर सुद्धा घालू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
ब्लाऊज शिवायला वेळ मिळत नाही? मग साडीवर स्टाईल करा ट्रेंडी क्रॉप टॉप

सर्वच महिलांच्या कपाटात असंख्य क्रॉप टॉप असतात. फुल स्लीव्ह क्रॉप टॉप कोणत्याही रंगाच्या कॉटन साडीवर अतिशय सुंदर दिसतो. क्रॉप टॉप तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकता.

ऑफिसमधील पार्टीसाठी किंवा वाढदिवसाच्या पार्टीला जाताना साडीवर तुम्ही पफ स्लीव्हज ब्लाऊज स्टाईल करू शकता.पफ स्लीव्हज क्रॉप टॉप तुम्हाला रॉयल लुक दिसेल.

व्ही-नेक लेयर्ड क्रॉप टॉप साडीवर किंवा लॉंग स्कर्ट दोन्हीवर कॅरी करू शकता. व्ही-नेक लेयर्ड क्रॉप टॉप डिझायनरमी, प्रिंट साड्यांवर शोभून दिसतो.

तुम्हाला जर हटके लुक हवा असेल तर तुम्ही बलून स्लीव्हज क्रॉप टॉप साडीवर घालू शकता. या पद्धतीचे क्रॉप टॉप ऑनलाईन सुद्धा सहज उपलब्ध होईल.

कॉटनच्या साडीवर तुम्हाला जर स्टायलिश लुक हवा असेल तर या डिझाईनचे क्रॉप टॉप घालून शकता.






