टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस १८ सध्या चर्चेचा विषय आहे. घरामधील स्पर्धक सध्या भरपूर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. रिॲलिटी टीव्ही शो बिग बॉस 18 चा प्रवास जसजसा पुढे जात आहे, तसतसा हा सीझन जिंकण्याची ताकद कोणत्या स्पर्धकाकडे आहे हे स्पष्ट होत आहे. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, चुम दरंग, दिग्विजय राठी आणि चाहत पांडे या खेळाडूंना खूप पाठिंबा मिळत आहे. परंतु आता या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत यावर एकदा नजर टाका.
नॉमिनेट झालेल्या सदस्यांची यादी. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेता करणवीर मेहरा सोशल मीडियावर प्रचंड प्रेम दिले जात आहे मागील आठवड्यामध्ये सुद्धा तो नॉमिनेट झाला होता. तेव्हा त्याला सर्वाधिक वोट मिळाले होते. या आठवड्यामध्ये सुद्धा त्याच्यावर घरच्यांनी निशाणा साधला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेत्री चाहत पांडे या आठवड्यामध्ये घराच्या सदस्यांच्या निशाण्यावर आहे. या आठवड्यामध्ये ती घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वाईल्ड कार्ड सदस्य दिग्विजय राठीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते. मागील आठवड्यामध्ये सुद्धा तो वोटिंगमध्ये टॉप २ मध्ये होता, या आठवड्यामध्ये तो पुन्हा नॉमिनेट झाला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला वाईल्ड कार्ड सदस्य कशिश कपूर या आठवड्यामध्ये पुन्हा घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली आहे, मागील आठवड्यामध्ये सर्वात कमी वोट्स असलेल्या सदस्यांमध्ये तिचे नाव होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेना या आठवड्यामध्ये नॉमिनेट झाला आहे. घरामधील सदस्यांनी त्याला घराबाहेर जाण्यासाठी निवडले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अभिनेता अविनाश मिश्रा मागील बऱ्याच आठवड्यापासून नॉमिनेशनपासून बचाव करत होता. या आठवड्यामध्ये त्याला घरच्यांनी निशाणा साधला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री एलिस कौशिक मागील काही आठवड्यापासून बिग बॉसच्या घरामधून अदृश्य झाली आहे. परंतु तिचा मित्र विवियन टाइम गॉड झाल्यामुळे तिचा नॉमिनेशनचा बचाव करण्यात आला होता आता या आठवड्यामध्ये तिच्यावर निशाणा साधला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया