केरळमधील अतिशय महत्वाचा सण म्हणजे ओणम. राज्यातील सर्वच भागांमध्ये ओणम सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी ५ सप्टेंबरला ओणम साजरा केला जाणार आहे. यादिवशी घरात केरळी पदार्थ बनवले जातात. दक्षिण भारतात ओणम सणाला विशेष महत्व आहे. यादिवशी घराची सजावट केली जाते. तसेच केळीच्या पानांवर जेवण वाढले जाते. केरळच्या प्रत्येक घरात ओणमच्या दिवशी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला ओणमनिमित्त कोणते पारंपरिक पदार्थ बनवले जातात,याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)
ओणमनिमित्त घरात बनवा 'हे' केरळी पदार्थ, सणाचा वाढेल गोडवा
दक्षिण भारतात ओणम निमित्त घरात अवियल हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून बनवला जातो. गरमागरम भात किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही अवियल खाऊ शकता.
दक्षिण भारतात इडली, डोसा, मेदुवडा इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. या पदार्थांसोबत सांबार खाल्ले जाते. याशिवाय जेवणात भातासोबत सांबार आवडीने खाल्ले जाते.
ओणमच्या दिवशी प्रत्येक घरात ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली जाते. ओल्या खोबऱ्याची चटणी इडली, डोसासोबत खाल्ली जाते.
केळीचा शीरा, केळीचे चिप्स, केळीची कोशिंबीर इत्यादी साऊथ इंडियन पदार्थ सणाची शोभा वाढवतात. याशिवाय केळीचे चिप्स खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.
गोड पदार्थांमध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे पायसम. तांदूळ, दूध, सुका मेवा आणि इतर अनेक चविष्ट पदार्थांचा वापर करून पायसम बनवले जाते.