सकाळच्या नाष्ट्यासह इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कधी पिझ्झा खाल्ला जातो तर कधी बर्गर खाऊन भूक भागवली जाते. पण नेहमी नेहमी विकतचे तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यत असते. तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात चरबीच्या गाठी वाढून उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. याशिवाय मधुमेह, वजन वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजार होतात. आज आम्ही आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात विकतचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला कोणती हानी पोहचते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
भूक लागलीये म्हणून जास्त अन्नपदार्थांचे सेवन करत असाल तर थांबा! overeating केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान

चविष्ट म्हणून खाल्लेले पिझ्झा, बर्गर वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे लठ्ठपणा वाढून पोटावर अनावश्यक चरबीचा थर तयार होतो. शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्यानंतर अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते.

अतिप्रमाणात तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयाच्या नसांमध्ये चिकट थर वाढतो आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचे गंभीर आजार होऊ शकतात.

जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर पोटावर दबाव येतो, ज्यामुळे अपचन, गॅस, आम्लता आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे खूप जास्त तिखट पदार्थ खाऊ नये. यामुळे काहीवेळा आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

काही लोकांना जास्त जेवल्यानंतर थकवा आल्यासारखे वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे रिअॅक्टिव्ह हायपोग्लाइसेमिया. ज्यात जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते.

जास्त खाल्ल्याने उलट्या , मळमळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या आहारात सहन होईल तितकेच जेवावे. जास्त जेवल्यास शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.






