• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • 5 Essential Tips To Keep Winter Flu And Pneumonia At Bay Expert Advice

Winter Tips: हिवाळी Flu आणि न्यूमोनियाला दूर ठेवण्यासाठी ५ अत्यावश्यक टिप्स! तज्ज्ञांचा सल्ला

हिवाळ्यात न्यूमोनिया आणि ताप येणे हे अत्यंत सामान्य आहे. मात्र न्यूमोनियाकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते आणि अगदी जीवावरही बेतू शकते. यासाठी काही सोप्या टिप्स तज्ज्ञांनी दिल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 07, 2026 | 09:08 PM
हिवाळ्यातील न्यूमोनिया आणि तापासाठी काय काळजी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

हिवाळ्यातील न्यूमोनिया आणि तापासाठी काय काळजी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • थंडीतील तापापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी
  • न्यूमोनिया होऊ नये म्हणून काय करावे
  • हिवाळी तापाची काळजी घेण्यासाठी टिप्स 
हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, आणि त्यासोबत खोकला, सर्दी तसेच फ्लू आणि न्यूमोनियासारख्या मोसमी संसर्गांनी कळस गाठला आहे. हवामान जितके अधिक थंड तितके विषाणू अधिक सहजपणे फैलावतात, म्हणजेच अधिक लोक आजारी पडतात. पण चांगली खबर म्हणजे वारंवार हात धुणे, चांगला आहार आणि शरीराची उब राखणे यांसारख्या साध्यासोप्या उपाययोजना करून तुम्ही या आजारांच्या दोन पावले पुढे राहू शकता. 

आपल्याला साधा फ्लू झालाय की काहीतरी अधिक गंभीर दुखणे आहे हे ओळखणे कठीण जाऊ शकते, कारण काही समान लक्षणे दोन्ही परिस्थितींमध्ये दिसून येतात. खोकला, थकवा, घसा बसणे, अंगदुखी किंवा अगदी धाप लागण्यासारखी लक्षणे ही फ्लूसारख्या श्वसनसंस्थेच्या आजाराची असू शकतात किंवा न्यूमोनियाचीही असू शकतात. ही लक्षणे तशीच राहिली किंवा आणखी बळावली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे सर्वोत्तम ठरते. 

डॉ. अरुण वाधवा, एमबीबीएस, एमडी, पीडिअ‍ॅट्रिक डॉ. अरुण वाधवा क्लिनिक, दिल्ली हे या मोसमादरम्यान अचूक निदानाच्या महत्त्वावर भर देताना सांगतात, “हिवाळी आजारांचे प्रमाण वाढत असताना, योग्य निदान करून घेणे हाच आजारातून बरे होण्याचा व गुंतागूंती टाळण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. तुम्हाला बरे वाटत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका – सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.”  

ज्येष्ठांमधील न्यूमोनिया: लक्षणे, कारणे आणि उपचार, तज्ज्ञांनी केला खुलासा

वेळच्यावेळी तपासण्या करून घेण्याची गरज 

आपल्या वेगवान आयुष्यामध्ये, कुणालाही आजारामुळे बाजूला पडण्याची इच्छा नसते. इथेच वेगवान चाचण्या मदतीला येतात, ज्या फ्लू आणि न्यूमोनियासारख्या श्वसनसंस्थेच्या आजारांचे निदान करण्याचा एक झटपट व कार्यक्षम मार्ग दाखवतात. 

डॉ. सोनू भटनागर, मेडिकल अफेअर्स डायरेक्टर, इन्फेक्शियस डिसीज, अबॉट वेळीच तपासण्या करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगतात, “श्वसनसंस्थेला होणाऱ्या संसर्गांना परिणामकारकरित्या हाताळण्याच्या कामी चाचण्या महत्त्वाची भूमिका निभावतात. श्वसनसंस्थेच्या वेगवेगळ्या आजारांसाठी रॅपिड टेस्टिंगचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे झटपट व अचूक निदान मिळणे शक्य होते.” या ऋतूमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही साध्यासोप्या उपाययोजना नक्की काय आहे याची आपण अधिक माहिती घेऊया 

कोणत्या आहेत साध्या योजना 

  • चाचणी करून घ्याः आपण कशामुळे आजारी पडतो हे माहीत असणे हे बरे होण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल ठरते. तुम्हाला श्वसनसंस्थेच्या एखाद्या संसर्गाची लक्षणे आढळून येत असतील तर आपल्या डॉक्टरांशी बोला आणि झटपट चाचणी करून घेण्याचा विचार करा. रॅपिड टेस्ट्समुळे लवकर उत्तरे मिळण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टर योग्य उपचार निवडण्यास सक्षम बनतात, जेणेकरून तुम्हाला लवकर बरे वाटावे
  • आपल्या स्थितीवर देखरेख ठेवाः आपल्या लक्षणांवर व त्यांच्या तीव्रतेवर लक्ष ठेवा. ताप वाढत असेल किंवा कोणतीही लक्षणे बिघडत चालल्याचे दिसून येत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • उपचार घ्या: लवकरात लवकर निदान झाल्यास तुम्ही तत्परतेने उपचार मिळवू शकता. औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण काटेकोरपणे पूर्ण करण्याची व लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी आणि संसर्गाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची काळजी घ्या
  • स्वत:ची काळजी घ्या: भरपूर आराम व झोप घ्या. सावकाशीने वागा, शरीराची आर्द्रतेची पातळी जपा (पाणी, ब्रॉथ, शहाळ्याचे पाणी किंवा ताज्या फळांचा रस घेऊन) आणि सकस आहार घ्या
  • घरी रहा: तुम्हाला आजाराची लक्षणे जाणवत असल्यास तुम्ही स्वत:ला वेगळं करायला हवं. असं केल्याने तुम्हाला बरे होण्यासाठीचा वेळ मिळेल तसेच संसर्ग इतरांपर्यंत पोहोचणार नाही याचीही खबरदारी घेतली जाईल
व्हायरल न्यूमोनियावरील लसीकरण, कोणत्या लस घेणे आवश्यक सांगताहेत तज्ज्ञ

लक्षात ठेवा 

हिवाळा ऐन भरात असताना, आपण दोन पावले पुढे राहत आपल्या आरोग्याचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही बरे असाल तर हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि इतरांपासून अंतर राखणे अशा काही सोप्या प्रतिबंधात्मक सवयी बाळगा. फ्लू आणि न्यूमोनियासाठीच्या लस घेणे हा सुरक्षित राहण्याच्या काही सर्वोत्तम मार्गांपैकी एक मार्ग आहे. या उपाययोजना केल्याने तुम्हाला सुरक्षितपणे या ऋतूचा आनंद घेता येईल आणि तुमच्या कुटुंबातील तुमचे प्रियजनही निरोगी राहतील.

Web Title: 5 essential tips to keep winter flu and pneumonia at bay expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Health News
  • Winter Tips news

संबंधित बातम्या

Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव
1

Global Health: कोरोनाव्हायरस नंतर ‘या’ भयानक व्हायरसने काढले डोके वर; 68 कोटी लोकांना संसर्ग, 2 लाख मृत्यू अन् जागतिक भीषण वास्तव

Ayushman Bharat Scheme: गरिबांसाठी दिलासादायक निर्णय? आयुष्मान भारतची विमा मर्यादा दुप्पट होणार
2

Ayushman Bharat Scheme: गरिबांसाठी दिलासादायक निर्णय? आयुष्मान भारतची विमा मर्यादा दुप्पट होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: विखे- जगताप यांची जादू चालली! भाजप-राष्ट्रवादी युतीला नगरमध्ये बहुमत

Ahilyanagar News: विखे- जगताप यांची जादू चालली! भाजप-राष्ट्रवादी युतीला नगरमध्ये बहुमत

Jan 17, 2026 | 07:12 PM
DC vs RCB WPL 2026 LIVE :  RCB ने TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; DC करणार फलंदाजी

DC vs RCB WPL 2026 LIVE :  RCB ने TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; DC करणार फलंदाजी

Jan 17, 2026 | 07:12 PM
Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही या आठवड्याचे खरे..”, प्रभू शेळकेच्या कामगिरीवर रितेश भाऊची शाबासकी, म्हणाला…

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही या आठवड्याचे खरे..”, प्रभू शेळकेच्या कामगिरीवर रितेश भाऊची शाबासकी, म्हणाला…

Jan 17, 2026 | 07:00 PM
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० देशाच्या भविष्यासाठी पूरक! मंत्री चंद्रकांत पाटलांची भूमिका

Jan 17, 2026 | 06:55 PM
Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…

Jan 17, 2026 | 06:50 PM
Mega Block News : ‘या’ स्थानकात लोकल थांबणार नाही! रविवार मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Mega Block News : ‘या’ स्थानकात लोकल थांबणार नाही! रविवार मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Jan 17, 2026 | 06:47 PM
‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!

‘या’ एका निर्णयामुळे Volkswagen च्या ‘या’ 2 कारचे मॅन्युअल व्हेरिएंट मार्केटमधून गायब!

Jan 17, 2026 | 06:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM
पोलीसांना फक्त ५०० रु भत्ता, ५ हजार रु भत्त्याची पोलीस बॉईज संघटनेची मागणी

पोलीसांना फक्त ५०० रु भत्ता, ५ हजार रु भत्त्याची पोलीस बॉईज संघटनेची मागणी

Jan 17, 2026 | 03:19 PM
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.