उत्तराखंड म्हणजे भारतातील जणू स्वर्गच! दरवर्षी येथे मोठमोठ्या गर्दीने लोकं येत असतात. मनाली असो वा हरिद्वार, येथे पर्यटकांनी भरलेले मैदान नेहमी दिसून येतात. पण जर तुही मसुरी येथे येत आहात. तर मित्रांनो! सावधान! मसुरी येथे स्थित असलेल्या परी टिब्बाला गेलात तर याद राखा! येथे अशा गोष्टी आहेत, ज्यांचा विचारही तुम्ही करू शकत नाहीत.
मसुरीयेथील परी टिब्बा एक हॉंटेड जागा. (फोटो सौजन्य - Social Media)
असे म्हणतात की थोरा मोठ्यांचा ऐकावं. कारण काय काय ठिकाणे अशी असतात, जेथे काय असेल? याचा विचार करणे आपल्या कपाळाच्या पलीकडचे आहे.
परी टिब्बा येथे मोठ्या प्रमाणात वीज कोसळते. पूर्वीच्या काळापासून येथील वातावरण असे आहे की येथे वीज कोसळणे आता सामान्य झाले आहे.
असे म्हणतात की परी टिब्बा येथे काही वर्षांपूर्वी दोन प्रेमी वीज कोसळण्याने मरून गेलीत. तेव्हापासून ही जागा शापित आहे.
येथे पर्यटक तसे फार कमी येतात. ज्या पर्यटकांना भूतबाधा असणाऱ्या जागेवर सफर करण्याची तीव्र इच्छा असते, ते पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
जरी लोकं या ठिकाणी भेट देत असली तर येथे येणाऱ्या लोकांची संख्या त्या मानाने फारच कमी आहे.