भारतीय लोकांच्या जीवनात चहाला वेगळंच महत्त्व असतं. गप्पा मारताना, आनंदाच्या वेळी किंवा दु:खाच्या वेळी, म्हणजेच प्रसंग कोणताही असो चहा पाहिजेच. काही लोकांना तर चहाची इतकी क्रेझ असते, की ते दिवसाला 4 ते 5 कप चहा अगदी सहज पिऊ शकतात. जगभरातील लोक एका दिवसात किती कप चहा पितात ते जाणून घेऊया. हा आकडा वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
जगभरातील लोकं एका दिवसात पितात इतके कप चहा, आकडेवारी वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही
चहा हे जगातील सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय आहे.
अहवालांनुसार, जगभरातील लोक एका दिवसात सुमारे 3 अब्ज कप चहा पितात.
याचा अर्थ असा की जगभरातील लोक एका दिवसात सुमारे 300 कोटी कप चहा पितात, ज्यामध्ये ग्रीन टी, लिंबू टी, आले टी आणि इतर अनेक प्रकारच्या चहाचा समावेश आहे.
जगभरातील बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात.
जास्त चहा पिल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. जास्त चहा पिल्याने तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून फक्त 1 किंवा 2 वेळा चहा पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तथापि, काही लोकांना दोनदापेक्षा जास्त वेळा चहा पिल्याने आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.