पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अत्यंत लोकप्रिय आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133 व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने पद्मनाभ मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
Photos of a huge crowd of devotees at Dagdusheth Halwai Ganpati temple Ganeshotsav 2025
यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून यामध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. हे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीचा गणेशोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. गावागावातून भाविक पुण्यामध्ये दाखल होत आहे. आत्तापर्यंत लाखो भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले आहे.
गणेशोत्सवामध्ये असणाऱ्या रविवारी भाविकांची मोठी रीघ दगडूशेठ हलवाई गणपतीला लागली होती. लाखोंच्या संख्येने भाविक गणरायापुढे नतमस्तक झाले आहे.
रविवारी सुटी असल्याने लाडक्या दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची झालेली अलोट गर्दी झाली आहे. याचे फोटो देखील समोर आले आहेत.
रविवारच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देखाव्यापासून मुख्य मंदिरापर्यंत भाविकांची रांग लागली होती. लोकांची गर्दी ही अक्षरशः मुंग्यांप्रमाणे दिसून येत होती.