गावाला गेल्यानंतर घराच्या अंगणात साप दिसल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त भिती वाटते. कारण सापाचे विष अतिशय भयानक असते. सापाचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सापाची खूप जास्त भीती वाटते. पण सगळ्यांचं भीती वाटणारे साप पर्यावरणासाठी अतिशय महत्वाचे आहेत. घराच्या आवारात साप फिरू नये म्हणून अनेक लोक त्यांना मारण्यासाठी घराच्या बाजूने हानिकारक रसायने मारू ठेवतात. मात्र असे न करता घराच्या अंगणात या वनस्पतींची रोप लावावी. यामुळे घराच्या अंगणात चुकूनही साप येणार नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)
घराच्या अंगणात चुकूनही फिरकणार नाही साप!
वर्मवुड वनस्पती तिच्या कडू वासासाठी प्रसिद्ध आहे. या वनस्पतीला अतिशय कडू वास येतो, जो सापांना आवडत नाही. त्यामुळे घराच्या बागेत वर्मवुड वनस्पती लावल्यास कीटक किंवा कोणत्याही प्रकारचे प्राणी येणार नाहीत.
तुळशीचे रोप प्रत्येक अंगणात लावले जाते. याशिवाय या वनस्पतीचा वापर औषधी गुणधर्म म्हणून सुद्धा केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म सापांना लांब ठेवतात.
मागील अनेक वर्षांपासून दवणा वनस्पतीचा वापर औषधासाठी केला जात आहे. ही वनस्पती बागेत आणून लावल्यास घराच्या अंगणात कधीच साफ फिरकणार नाही.
लसूणच्या वासाने अंगणात साप कधीच येणार नाहीत. लसूणचे रोप कुस्करून घराच्या अंगणात टाकून ठेवावे. याशिवाय लसूण कुस्करल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे साप येत नाहीत.
घराच्या अंगणात साप येऊ नये म्हणून गवती चहाची रोप लावावी. गवती चहाच्या वासाने साप दारात येत नाहीत. यामध्ये सिट्रोने नावाचा घटक आढळून येतो.