प्राजक्ता तू म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजे तूच! तुला पाहिलं की आमच्या मनाला सौंदर्याची खरीखुरी व्याख्या पटते. या मनाला चाहूल लागते की खरच! त्या स्वर्गात सुंदरी असतील तर त्यांचा चेहरा नक्कीच प्राजक्ता माळीसारखा असेल. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तरुणांच्या काळजात मुक्काम करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर पुन्हा एक वादळ आणलं आहे.
अंदाज असावा तर असा... 'प्राजक्ता तेरे बगैर दिल नही लगता!'
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये साडी परिधान केली आहे. थोडं गोल्डन टच असणाऱ्या या साडीमध्ये अभिनेत्री अप्सरांना टक्कर देत आहे.
साडीतली सुंदरा, नजरेत ती लाजरी, साडीमध्ये शाही… प्राजक्ता माळी म्हणजे अस्सल मराठी सौंदर्य!, अशा अनेक कौतुकांचा वर्षाव पोस्टखाली झाला आहे.
गळ्यातील हार, कानामध्ये असणारी इअररिंग्स... आह! म्हणजे बघताच क्षणी तुम्ही प्रेमात न्हाऊन जाल.
कॅप्शनमध्ये 'From The Royal League.' असे तिने नमूद केले आहे.