अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मराठी मालिकांमधील अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले जाते. पण मागील काही वर्षांपूर्वी तिला कर्करोगाची लागण झाली होती. त्यातून ती व्यवस्थित बरी झाली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी तिला पुन्हा एकदा कर्करोगाची लागण झाली. पण अखेर कर्करोगाशी झुंज देताना आज पहाटे चार वाजता तिने अखरेचा श्वास घेतला. चला तर जाणून घेऊया प्रिया मराठेबद्दल काही खास गोष्टी. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
प्रिया मराठेची कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी, जाणून घ्या तिच्याबद्दल 'या' काही खास गोष्टी
अभिनेत्री प्रिया मराठेने मराठी महिलाकांसोबतच हिंदी मालिकांमध्ये काम केले. हिंदी मालिका विश्वात तिने आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. तिने मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ इत्यादी मालिका आणि शोमध्ये केले होते. तिने मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
प्रिया मराठे ही केवळ अभिनेत्री नसून एक उद्योजिका सुद्धा होती. तिने काही वर्षांआधी स्वतःचा कॅफे सुरु केला होता. तसेच तिने नवीनच सुरु केलेल्या कॅफेचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले होते.
प्रियाने अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केले जाते. ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तिच्या निधनाची माहिती मिळताच मराठी सेलिब्रेटी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मागील काही वर्षांपासून प्रिया सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. तिची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिने ‘तुझेच मी गीत गाते’ या मालिकेतून ब्रेक घेतला होता. तिच्या निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.