बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिची मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनाससोबत वेळ घालवताना दिसली आहे. प्रियांका या शेअर केलेल्या फोटोमध्ये खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. सध्या, प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीसोबत दक्षिण फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे ज्याची एक झलक आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित दिसत आहे, आणि मुलगी मालती मेरी देखील तिच्यासह खूप सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे व्हेकेशनमधील काही अप्रतिम फोटो पहा. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
या शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाने बिकिनी घातली असून, पती निक जोनाससोबत पोज देताना दिसत आहे. दोघेही क्रूझवर आहेत. निक बसला आहे आणि प्रियांका त्याचा आधार घेऊन पडली आहे.
या फोटोत प्रियांका चोप्रा सेल्फी घेताना दिसत आहे. प्रियांकाने ब्रॅलेट टॉपसह पलाझो घातला आहे. या फोटोमध्ये तिच्या बाजूला निक जोनास असून तो सूर्यस्नान करताना दिसत आहे.
या फोटोत प्रियांका चोप्रा समुद्राच्या पाण्यात चमकताना दिसत आहे. प्रियांका या फोटोमध्ये एका छोट्या बोटीमध्ये आराम करताना दिसत असून तिचा बोल्ड लुक दाखवत आहे.
या फोटोमध्ये प्रियांका चोप्राने ऑफ व्हाइट कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. तिने कॅप घालून तिचा लूक पूर्ण केला आहे आणि तिने अप्रतिम पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
प्रियांका चोप्राच्या या व्हेकेशनमध्ये मुलगी मालती मेरीनेही खूप मजा केली. एका फोटोत मालती चष्मा घालून तिचा स्वॅग दाखवत आहे. निक त्याच्या मुलीला फोटो काढण्यात मदत करत आहे. दुसऱ्या फोटोत ती समुद्राच्या लाटांचा आनंद लुटत आहे.
या फोटोमध्ये प्रियांका चोप्राचा पती निक जोनास गिटार वाजवताना दिसत आहे. त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आहे आणि तो वन साइड पोझमध्ये अप्रतिम दिसत आहे.