बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ जुलै १९८५ रोजी मुंबईत जन्मलेला रणवीर बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. लोकप्रियता आणि संपत्ती दोन्हीच्या बाबतीत रणवीर आघाडीवर आहे. रणवीर सिंहने त्याच्या अभिनय कौशल्याने आपल्या चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. 'लुटेरा' असो, 'बाजीराव मस्तानी' किंवा मग 'पद्ममावत'मधील अलाउद्दीन खिलजीची भूमिका, त्याने सर्व व्यक्तिरेखा चोख निभावल्या आहे. रणवीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया...
Ranveer Singh Birthday

४० वर्षीय अभिनेता रणवीर सिंह गेल्या १४ वर्षांपासून चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करीत आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहेच, पण इंडस्ट्रीमध्ये एक सुपरस्टार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'सिम्बा' आणि 'गली बॉय' यांसारख्या हिट चित्रपटानंतर रणवीर सिंहने आपल्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. सियासत डॉटकॉमनुसार, रणवीर सिंह एकूण संपत्ती सुमारे ३६२ कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्याने अनेक ब्रँड्ससोबतही काम केलं आहे.

रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयाइतकाच फॅशनसाठीही खूप लोकप्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. रणवीर पेप्सी, चिंग्स, मन्यावर, बिंगो आणि हेड अँड शोल्डर्स सारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करतो.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

याशिवाय, अलिबागमध्ये २२ कोटी रुपयांचे हॉलिडे होम, प्रभादेवी (मुंबई) मध्ये १६ कोटी रुपयांचे अपार्टमेंट, खार (मुंबई) मध्ये त्याचा जुना फ्लॅट आहे, रणवीर-दीपिकाचा गोव्यात एक खाजगी बीचफ्रंट व्हिला देखील आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)






