बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरात वाढलेल्या थकव्यामुळे वारंवार चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर किंवा झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा जाणवतो. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच आहारात वेगवेगळ्या फळांच्या रसाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थकवा कमी करण्यासाठी कोणत्या रसांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेला थकवा- अशक्तपणा कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
पोषक तत्वांचा खजिना म्हणून कायमच आवळ्याचे नाव घेतले जाते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्यामुळे नियमित एक ग्लास आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. आवळ्याचा रस प्यायल्यामुळे थकवा कमी होतो.
संत्र्याच्या रसात विटामिन सी सोबतच अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी संत्र्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे हृदयाच्या आजारांपासून सुटका मिळते.
शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी बीटचा रस प्यावा. लहान मुलांना बीट खायला आवडत नाही. त्यामुळे मुलांना तुम्हाला बीटचा रस किंवा बीटपासून बनवलेले पदार्थ खाण्यास देऊ शकता.
नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीराला कोणत्याही आजाराची लागण होणार नाही, असे डॉक्टर सुद्धा कायमच सांगतात. त्यामुळे सफरचंदाचा रस नियमित प्यायल्यास कायम निरोगी राहाल.
डाळिंब खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. डाळिंबामध्ये असलेल्या लोहामुळे शरीराला रक्त पुरवठा होतो आणि कोणत्याही पोषक घटकांची कमतरता जाणवत नाही.