जगभरात लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पोटावर वाढलेला चरबीचा घेर काहीवेळा आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे कारण बनतो. जंक फूड, चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप, बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर संतुलन पूर्णपणे बिघडून जाते. पोटावर वाढलेल्या अनावश्यक फॅटमुळे महिलांना काहीवेळा खूप लाजिरवण्यासारख्या वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे झोपेत असतानाही पोटावर वाढलेला चरबीचा घेर वितळून जातो. (फोटो सौजन्य – istock)
'या' पेयांच्या नियमित सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चयापचय वाढवतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी नियमित हळदीच्या दूध प्यावे.

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. या पाण्यात असलेले गुणधर्म शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात आणि वजन कमी होते.

आल्याच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. नियमित आल्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल.

कॅमोमाइल चहाचे सेवन केल्यामुळे झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते. या चहाच्या सेवनामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया सुरळीत होते आणि शरीराला अनेक फायदे होतात.

शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यावे. लिंबू पाण्याचे महिनाभर नियमित सेवन केल्यास महिनाभरात तुम्ही स्लिम आणि फिट दिसाल.






