औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म शरीराला गंभीर आजारांपासून दूर ठेवतात. मधात विटामिन सी, ए, इ, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, मॅंगनीज, कॉपर आणि सेलेनियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये नियमित एक चमचा मधाचे सेवन केल्यास शरीरात उष्णता कायम टिकून राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मध खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका

घशात वाढलेली खवखव, खोकला, सूज कमी करण्यासाठी कोमट पाण्यासोबत मध खावे. यामुळे घशाच्या स्नायूंना आराम मिळतो आणि शरीराला अनेक फायदे होतात.

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मधाचे सेवन करावे. झोपण्याआधी एक चमचा मध खाल्ल्यास ताण कमी होतो, मन शांत होते, गाढ आणि चांगली झोप लागते.

पोट बिघडणे, अपचन, गॅस किंवा आम्लपित्त इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मधाचे सेवन करावे. आठवडाभर नियमित मध खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतील.

मधाच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. त्यामुळे मध खाल्ल्यास शरीरात उष्णता टिकून राहते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यावे. पोटावर वाढलेले चरबीचा घेर कमी करण्यासाठी मध फायदेशीर ठरते.






